Petrol-Diesel Price Today on 14 April 2022 : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर जारी केले आहेत. देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. देशातील पेट्रोल-डिझेलचे दर आज स्थिर आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईनं हैराण करुन सोडलं आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. सातत्यानं वाढणाऱ्या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसला आहे.
भारतीय तेल कंपन्यांनी 6 एप्रिलपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या दरांत कोणतीही दरवाढ केलेली नाही. पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने जारी केलेल्या नव्या दरांनुसार, देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचे दर सध्या 120.51 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरनं विकलं जातं आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्यात सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. यापूर्वी गेल्या बुधवारी (6 एप्रिल) रोजी पेट्रोल-डिझेल दोन्ही इंधनाच्या दरांमध्ये 80 पैसे प्रति लिटरची वाढ करण्यात आली होती. दरम्यान, 22 मार्चपासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये 10 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे. तरीही देशातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती 120 रुपये प्रति लिटर पार पोहोचल्या आहेत. तर डिझेलनंही शंभरी ओलांडली आहे. देशात 22 मार्चनंतर सातत्यानं पेट्रोल-डिझेलच्या दरांच्या वाढीचं सत्र सुरु होतं. गेल्या 22 दिवसांत तेलाच्या किमतींमध्ये जवळपास 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जर तुम्हीही तुमच्या गाडीची टाकी फुल करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी एकदा तुमच्या शहरांतील दर जाणून घ्या.
- देशातील महत्त्वाच्या शहरांचे दर काय?
- शहरं पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
- मुंबई 120.51 104.77
- दिल्ली 105.41 96.67
- चेन्नई 110.85 100.94
- कोलकाता 115.12 99.83
- हैद्राबाद 119.49 105.49
- कोलकाता 115.12 96.83
- बंगळुरू 111.09 94.79
- महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांतील पेट्रोल-डिझेलचे दर
- शहरं पेट्रोलचे दर (प्रति लिटर) डिझेलचे दर (प्रति लिटर)
- मुंबई 120.51 रुपये 104.77 रुपये
- पुणे 120.60 रुपये 103.28 रुपये
- नाशिक 120.02 रुपये 102.73 रुपये
- परभणी 123.51 रुपये 106.08 रुपये
- औरंगाबाद 120.63 रुपये 103.32 रुपये
- कोल्हापूर 120.64 रुपये 103.35 रुपये
- नागपूर 121.03 रुपये 103.73 रुपये
दररोज बदलतात पेट्रोल-डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात.