Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट, लवकरच देशातही पेट्रोल-डिझेलच्या किमती घटणार?

421

Petrol and Diesel Price in India : आतंरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेल्याच्या (Crude Oil) किमतींमध्ये सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशातच भारतीय बाजारांमध्ये इंधनाच्या किमती मात्र काही दिवस स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी 3 नोव्हेंबरपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आज 15 नोव्हेंबर म्हणजेच सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. 

भारतीय तेल कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) नं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत  94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत (Petrol Price);103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत  86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे. 

कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये आज डब्लूटीआई क्रूड (WTI crude) 0.52 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यासोबतच कच्च्या तेलाच्या किमती  80.37 च्या लेव्हलवर दिसून येत आहेत. तर ब्रेंट क्रूड  0.61 टक्क्यांनी घटून 81.67 लेव्हलवर पोहोचलं आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here