Pankaja Munde In Pathardi Shevgaon Vidhansabha : “पदाधिकारी निवडीच्या स्थगितीवरून आमदार राजळे यांच्यावर नाराजी…”

मुंडे परिवाराचे आणि पाथर्डीचे एक वेगळे भावनिक नाते आहे. भगवानबाबा गड आणि दसरा मेळावा हे समीकरण कित्येक वर्षं गोपीनाथ मुंडेंनी जपले. आजही घराघरात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे फोटो देव्हाऱ्यात त्यांचे हजारो समर्थक ठेवतात. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर हेच प्रेम पंकजा मुंडे यांना मिळताना दिसत आले.


शिवशक्ती परिक्रमा यात्रेत पंकजा मुंडेंनी मोहटादेवी भेट टाळल्याने चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांनी नवरात्रात आपण मोहटागडावर दर्शनाला येणार आहेत, अशा चचदिखील झाल्या. त्यामुळे एकंदरीत पाथर्डी मतदारसंघांतील भाजप अंतर्गत असलेली चलबिचल सध्या चर्चेत असून, भाजपसमोर आणि त्याच बरोबर आमदार मोनिका राजळेंसमोर नाराजी दूर करण्याचे एक आव्हान असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या सर्व विषयावर स्वतः पंकजा मुंडे यांच्याकडून अद्याप कसलेही वक्तव्य समोर आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले असून, निश्चितच राजकीय वर्तुळात उत्सुकता असणार आहे.
पंकजा मुंडे यांनी राज्यात शिवशक्ती यात्रा काढून केलेला दौरा माध्यमात चर्चेत आला. दरम्यान, मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचे जीएसटी न भरल्याचे कारण देत त्यांच्यावर जीएसटी विभागाने कारवाईची नोटीस बजावली. एकंदरीत पंकजा मुंडे सत्ताधारी भाजप पक्षात असताना त्यांना डावलले जात असल्याच्या आणि 2019 परळीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आपले अस्तित्व नगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेवगाव मतदा संघातून सिद्ध करत, राज्याच्या मुख्य राजकीय प्रवाहात येऊन नेतृत्व करावे, यासाठी नगर जिल्ह्यातील त्यांना मानणारा वर्ग सक्रिय झाला आहे