
नगर : इराणनं पाकिस्तानवर (Pakistan) क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला चढवत दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली होती. इराणच्या या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानने इराणवर एअर स्ट्राईक (Airstrike) केल्याचा दावा केला. इराणच्या हल्याच्या एका दिवसानंतर पाकिस्ताननं इराणच्या दहशतवादी स्थळांवर हल्ला चढवल्याचा दावा केला आहे.

इराणकडून पाकिस्तानविरोधी कारवायाचा दावा (Pakistan attack on Iran)
पाकिस्तानी माध्यमांमार्फत समोर आलेल्या माहितीनुसार, इराणमधील बीएलए दहशतवादी तळांना लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, बलुचिस्तान लिबरेशन फोर्स यासारखे बलूच फुटीरतावादी दहशतवादी गट इराणमध्ये सक्रिय आहेत, जे पाकिस्तान विरोधी कारवाया करतात. बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी इराणमध्ये राहून पाकिस्तानविरुद्ध कट रचतात आणि हल्ले करतात. इराण अशा संघटनांना आश्रय देऊन मदत करतो, असा पाकिस्तानचा दावा आहे.
पाकिस्तान-इराण संबंध कसे ? (Pakistan attack on Iran)
पाकिस्तान आणि इराणमध्ये अभूतपूर्व तणाव सुरू आहे. इराण आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या सीमा लागून आहेत, तरीही दोघांमध्ये परस्परावलंबी संबंध नाहीत. दोन्ही देश वेळोवेळी एकमेकांवर दहशतवादी हल्ल्यांचे आरोप करत असतात. इराणनं अनेकवेळा पाकिस्तानवर सीमेपलीकडून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा आरोप केला आहे.