Corona Symptoms : कोरोना विषाणूची (Corona Virus) लागण झालेल्या आणि न झालेल्या प्रत्येकाच्या मनात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे संसर्ग झाल्यानंतर किती दिवसांनी त्याची लक्षणे दिसतात. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे किती दिवसात कळते आणि लक्षणे किती दिवसात येतात? याबाबत सुरुवातीपासूनच गोंधळाचे वातावरण आहे. वास्तविक, कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून त्यात बरेच बदल झाले आहेत.
डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनुसार, विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर 5-6 दिवसांनी तुम्हाला लक्षणे जाणवू लागतात. मात्र, आता याबाबत एक नवीन संशोधन समोर आले आहे. अलीकडेच ब्रिटनमध्ये झालेल्या एका संशोधनात असे म्हटले आहे की, आता कोरोनाची लक्षणे संसर्ग झाल्यानंतर 2 दिवसांनीच दिसू लागली आहेत.
हे संशोधन नुकतेच लंडनमध्ये करण्यात आले आहे. ज्यामध्ये 36 जणांचा समावेश होता. यामध्ये 12 ते 29 वर्षे वयोगटातील लोकांना संसर्ग झाला होता. यात सामील लोकांना नाकातून कोरोना विषाणूची लागण झाली होती. या लोकांना 14 दिवस रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. या संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोनाची लक्षणे 5 व्या दिवशी शिखरावर असतात. त्यानंतर हा विषाणू नाकापर्यंत पोहोचतो. सर्वप्रथम, कोरोनाची लक्षणे घशात दिसतात. अभ्यासात असे म्हटले आहे की, कोरोना संसर्गामुळे नाकात विषाणूचा भार खूप वेगाने वाढतो.
अभ्यासात असे म्हटले आहे की, कोरोना संसर्ग झाल्यानंतर 2 दिवसात व्हायरसची लक्षणे दिसू लागतात. यामध्ये आधी घशात त्रास होतो आणि नंतर नाकात विषाणूचा भार झपाट्याने वाढतो. संशोधनात असे म्हटले आहे की, ज्या लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत, त्यांची प्रतिकारशक्ती खूप मजबूत होती.
संशोधनात असे म्हटले आहे की, कोरोना विषाणू खूप वेगाने पसरतो आणि त्याची संसर्ग क्षमता देखील खूप जास्त आहे. त्याचा प्रभाव नाकामध्ये सर्वाधिक असतो, हा संसर्ग नाक आणि तोंडाद्वारे सर्वात सामान्य आहे.