Omicron : BioNtech आणणार ओमिक्रॉनवरील प्रभावी लस

651

Omicron Variant : जगभराची चिंता वाढवणाऱ्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटवर प्रभावी लस शोधण्याचं काम बायोएनटेक (BioNTech) कंपनीनं सुरु केलं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढल्यास पुढील 100 दिवसांत लस बाजारात आणण्याची तयारी बायोएनटेकनं दर्शवली आहे. बायोएनटेक ही अमेरिकेत फायझर  (Pfizer) सोबत मिळून कोविड (Covid-19) लस विकसित करणारी कंपनी आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग पसरत असल्याचं लक्षात येताच कंपनीनं त्यावर काम करणं सुरु केलं असल्याचं बायोएनटेककडून सांगण्यात येतंय. 

ओमिक्रॉन (B.1.1.529) जगभरात पसरण्याची शक्यता गृहीत धरुन लसीमध्ये आवश्यक ते बदल करत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. बायोएनटेकची सध्याची लस ओमिक्रॉनवर किती प्रभावी ठरते हे निरीक्षणानंतर येत्या दोन आठवड्यात कळेल आणि त्या निष्कर्षावर आधारीत आवश्यक बदल लसीमध्ये केले जातील. ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढलाच तर जास्तीत जास्त 100 दिवसांच्या आत यावरची नवी लस बाजारात आणण्याची तयारी असल्याचं बायोएनटेकच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

फायझर आणि बायोएनटेक कंपनीनं म्हटलं की, ”आम्हांला आशा आहे की, आम्ही ओमिक्रॉन व्हेरिएंटवर 100 दिवसांत प्रभावी लस संशोधन आणि उत्पादन करण्यात सक्षम आहोत. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आधीच्या व्हेरिएंटपासून खूप वेगळा आहे.” कंपनीनं महिनाभर आधीच ओमिक्रॉन व्हेरिएंटवर लस बनवण्याची तयारी सुरु केल्याचं सांगितलं आहे.

कोविड  लस बनवणारी दुसरी मोठी कंपनी  मॉडर्ना (Moderna) ने रविवारी सांगितले की, 2022 च्या सुरुवातीपर्यंत ओमिक्रॉनवरील त्यांचीही लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here