old castle : संगमनेरातील दोनशे वर्षे जुन्या वाड्यात सापडला ऐतिहासिक ठेवा

    156

    old castle : संगमनेर: दुसरे बाजीराव पेशव्यांचे (Second Bajirao Peshwa) दिवान असलेले सरदार त्रिंबक डेंगळे (Sardar Trimbak Dengle) यांच्या निमगावजाळी (ता. संगमनेर) येथिल ऐतिहासिक वाड्यात (old castle) त्यावेळी ते देवपुजेसाठी वापरात असलेली दोनशे वर्षं जुनी पाषाणाची विठ्ठल (Vitthal) मुर्ती आढळली आहे. हा ऐतिहासिक ठेवा हाती लागल्यानंतर “यंदा कार्तिकी पूर्वी विठ्ठल भेटला” अशा माहिती इतिहासाचे अभ्यासक सुमित डेंगळे यांनी दिली.

    काही दिवसांपूर्वी निमगावजाळी येथील सरदार त्रिंबक डेंगळे यांचा वाडा पाहण्यासाठी काही माणसं आली होती. सुमित डेंगळे व डॉ. विजय वादक हे नेहमीप्रमाणे आलेल्या माणसांना वाडा व त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सांगत होते. यावेळी प्रवेशद्वार, तटबंदी, आड, मागचा चौक आदी वाड्यातील जुन्या वास्तू दाखवण्यात आल्या. यावेळी नेहमी बंद असलेल्या कोनाडा डॉ. वदक यांनी उघडला असता त्यामध्ये सागाचे सुंदर महिरपी देवघर व दोन्ही बाजूला दोन कप्पे काढले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे कुतुहलापोटी त्यांनी हात आतमध्ये घातला असता काळ्या पाषाणातील आखीव रेखीव, हातभर उंच व एक हात तुटलेली पांडुरंगाची मुर्ती बाहेर काढली, हे पाहून सारेच अवाक झाले होते.

    सरदार त्रिंबक डेंगळे यांच्या पूजेतील विठ्ठलमूर्ती योगायोगाने सापडल्यामुळे डॉ. विजय वदक, सुमित डेंगळे यांच्यासह भावना तांबे, निलेश कहाळे, आरती डेंगळे, प्रभाकर टिळेकर हे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले. सरदार त्रिंबकजी डेंगळे हे विठ्ठलभक्त असल्याने आळंदीला माऊलींच्या दर्शनाला नित्यनेमाने जात असत. आळंदी देवस्थानला स्वतःच्या खाजगीतून इनाम जमीनही त्यांनी करून दिली होती. तुकारामांचे अभंग त्यांना विशेष आवडीचे होते. पंढरपूर वाऱ्याही ते करत. त्यांचे वंशजही विठ्ठल भक्त, वारकरी संप्रदायाचे. त्रिंबकजी डेंगळे यांचे नातू दादासाहेब यांनी १८९१ साली गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह निमगांवजाळीत घडवून आणला होता. त्यामुळे मुर्तीरुपी सापडलेला हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची मोठी जबाबदारी आता पार पाडावी लागणार आहे, असे प्रतिपादन 
    इतिहास अभ्यासक सुमित डेंगळे यांनी केले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here