- Nitin Gadkari in Dhule : येत्या तीन वर्षात धुळे जिल्ह्यातील रस्ते हे अमेरिकेच्या दर्जाचे असतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज धुळे शहर दौऱ्यावर आले असताना बोलत होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम, प्रकल्पांचे उद्घाटन, राजर्षी छत्रपती शाहू नाट्यमंदिरात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन झाले.
- यावेळी गडकरी म्हणाले की, येणाऱ्या काळात मी टोल नाके बंद करून जीपीएस यंत्रणा उभी करणार आहे. त्यामुळे टोल न भरण्याचं टेन्शनच संपून जाईल. हेच नंदुरबार व धुळे जिल्ह्यात करायचे आहे. याच दृष्टीने येत्या तीन-चार वर्षात दोन्ही जिल्ह्यातील रस्ते हे अमेरिकेच्या दर्जाचे असतील असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
- गडकरी यांनी म्हटलं की, धुळ्यात येताना माझं मन शांत होतं. कारण खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी जी काम सांगितले होती ती कठीण होती. सुलवाडे जामफल योजना पूर्ण झाली. या योजनेचं काम पूर्ण झाल्याने माझ्या डोक्यावरील ओझं कमी झाल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
Home महाराष्ट्र Nitin Gadkari : धुळे जिल्ह्यातील रस्ते अमेरिकेच्या दर्जाचे असतील: मंत्री नितीन गडकरी






