NeoCov coronavirus: कोरोनाचा नवा व्हेरियंट Neo Cov ने वाढवली चिंता, नेमका काय आहे हा प्रकार? कितपत धोका?

543

NeoCov coronavirus: जगभरातील सर्व देशांना मागील दोन वर्षांपासून विळखा घातलेल्या कोरोनाचा धोका कमी होतोय असे वाटत असतानाच एका नव्या व्हेरियंटचा जन्म होत आहे. काही दिवसांपूर्वी आलेला ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटचा धोका कायम असताना आता नवा आणि अधिक धोकादायक निओकोव्ह (Neo Cov) हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान सध्या प्राण्यांमध्ये आढळणारा या व्हेरियंटचा मनुष्यांना कितपत धोका आहे? याबाबतही शोध सुरु आहे.

रशियाच्या स्टेट व्हायरोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीत त्यांनी म्हटले आहे की, ‘NeoCoV या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत चीनी संशोधकांनी मिळवलेल्या माहितीच्या आधारे अभ्यास केल्यानंतर हा व्हेरियंट सध्या प्राण्यांमध्ये अधिक फैलावत असून माणसांमध्ये याचा वेगवान प्रादुर्भाव अजूनतरी सुरु झालेला नाही.’

दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेला हा व्हेरियंट नवा नसून याचा प्रथम शोध 2012 आणि 2015 रोजी मध्य पूर्वेकडील देशांमध्ये लागला होता. या विषाणू आधी वटवाघुळांमध्ये आढळला होता, जो आता माणसांमध्येही आढळल्याने जगभराची चिंता वाढली आहे. कोरोना सर्वात आधी आढळलेल्या चीनच्या वुहानमधील शास्त्रज्ञांनी या निओकोव्ह व्हेरियंटबाबत खास काळजी घेण्याचं आवाहन करत लागण झालेल्या तीन पैकी एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहितीही दिली आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here