नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगानं (UPSC) घेतलेल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) आणि नावल अकादमीच्या (Naval Academy) परीक्षेत 8 हजार उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी 1002 या महिला उमेदवार असल्याची माहिती आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं बुधवारी निकाल जाहीर केला होता. तर, एनडीए प्रवेशासाठी 14 नोव्हेंबरला परीक्षा घेण्यात आली होती.1002 मधून 19 जणांची निवड होणारकेंद्रीय लोकसेवा आयोगानं बुधवारी जाहीर केलेल्या निकालात 8 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये 1002 महिला उमेदवारांचा समावेश आहे. यापैकी 19 विद्यार्थिनींना एनडीएच्या पुढील वर्षांच्या बॅचमध्ये प्रवेश मिळणार आहे. आता या विद्यार्थिंनीना स्टाफ सिलेक्शन बोर्डाद्वारे घेतल्या जाणाऱ्या मेडिकल टेस्ट, मुलाखतीला सामोरं जावं लागेल.
पावणे दोन लाख विद्यार्थिनींची परीक्षेसाठी नोंदणीराज्यसभेत संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी एनडीए परीक्षेसाठी 5 लाख 75 हजार 856 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 1 लाख 77 हजार 654 विद्यार्थिनींनी नोंदणी केली होती.एकूण 400 जागा विद्यार्थ्यांना प्रवेशनॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये 2022 च्या बॅचमध्ये एकूण 400 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये आर्मीकडे 208 जागांचा कोटा असेल. 208 मधील 10 जागा या महिला उमेदवारांसाठी राखीव असतील.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं महिला उमेदवारांना संधीसुप्रीम कोर्टानं नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश घेण्यासाठी परीक्षेला बसण्यास परवानगी दिली होती. सुप्रीम कोर्टानं महिलांना संधी देण्याला विरोध करणाऱ्यांना चांगलंच फटकारलं होतं. याशिवाय संबंधित घटकांनी त्यांची भूमिका बदलण्याबाबत सुनावलं होतं. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगानं एनडीएची परीक्षा 14 नोव्हेंबरला परीक्षा घेतली होती.