NCP Strike : राष्ट्रवादी काँग्रेसची कर्जत बंदची हाक

    104

    NCP: कर्जत : नागपूर येथे युवा संघर्ष यात्रेवर (Yuva Sangharsh Yatra) केलेला लाठीहल्ला तसेच कर्जत-जामखेड युवकांच्या अस्मितेचा एमआयडीसी (Karjat-Jamkhed MIDCमंजुरीच्या अंतिम टप्प्यात असलेला प्रस्ताव रद्द केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) वतीने गुरुवारी (ता.१४) कर्जत बंदची (Borrowing offहाक देण्यात आली. अशा आशयाचे निवेदन कर्जत तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.

    कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार दरबारी मांडण्यासाठी पुणे ते नागपूर युवा संघर्ष पदयात्रा काढली होती. तब्बल ८०० किमी अंतर पार करून यात्रा मंगळवारी (ता.१२) नागपूर अधिवेशनावर धडकली. नागपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात असताना स्थानिक पोलीसांनी संघर्ष यात्रा अडवत दडपशाही करून नेत्यांसह युवक कार्यकर्त्याना अटक केली. या घटनेचा कर्जत राष्ट्रवादीने तीव्र शब्दात निषेध केला.

    यासह आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडची आमदारकीची धुरा हाती घेतल्यापासून मतदारसंघातील युवकांसाठी एमआयडीसी व्हावी, यासाठी सतत पाठपुरावा करीत महाविकास आघाडी सरकारच्या काळात मौजे खंडाळा-पाटेवाडी एमआयडीसाठी आवश्यक असणारे सर्व्हे, बैठका, कायदेशीर सर्व बाबी पूर्ण केल्या होत्या. तसेच हाय पावर कमिटीची मंजूरी मिळवत केवळ महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री यांची फाईलवर सही झाली की कर्जत-जामखेड एमआयडीसीची अधिसूचना निघणार होती. सदरच्या सही साठी आमदार पवार यांनी भर पावसात विधानभवनात आंदोलन करीत मंत्री सामंत यांनी लवकरात-लवकर बैठक घेत सर्व बाबीना मंजुरी देतो, असा शब्द दिला होता. तो देखील पाळला नाही.

    कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेताना विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांना बोलावले. वास्तविक पाहता बैठकीस कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार रोहित पवार यांना बोलविणे क्रमप्राप्त असताना जाणून-बुजून त्यांना डावलण्यात आले. सदरच्या बैठकीत हास्यास्पद कारणे दाखवत एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द केला. विद्यमान सरकार कर्जत-जामखेडच्या युवकांच्या भविष्याशी केवळ राजकीय श्रेयवादासाठी खेळत आहे.

    यामुळे मतदारसंघ मागे पडत असून श्रेयवाद घेण्यासाठी एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करायला भाग पाडणारे आमदार राम शिंदेंचा राष्ट्रवादीने निषेध करीत प्रशासनास गुरुवारी कर्जत बंदचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार, प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, प्रा विशाल मेहेत्रे, नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, भाऊ तोरडमल, भास्कर भैलुमे, सचिन कुलथे, संतोष मेहेत्रे, राजेंद्र पवार, देवा खरात, सतिष समुद्र, रवी सुपेकर, भूषण ढेरे, संजय भिसे, नामदेव थोरात आदी उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here