NCP : राष्ट्रवादी’च्या संघर्ष यात्रेचा मंगळवारी नागपुरात समाराेप; शरद पवार, उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

    118

    NCP : नगर : राष्ट्रवादीची (NCP) संघर्ष यात्रा १२ डिसेंबर रोजी नागपुरात पोचणार आहे. पक्षाचे नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह काँग्रेस नेते मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह उपस्थित राहणार आहे, अशी माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली.

    देशमुख म्हणाले, ”आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली २४ ऑक्टोबर रोजी पुण्यातून महाराष्ट्रातील तरुणांना भेडसावणाऱ्या समस्यांसह विविध समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी यात्रेला सुरुवात झाली. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पदयात्रेने ८०० किलाेमीटर अधिक अंतर कापल्यानंतर त्याचा समारोप नागपुरात होईल. १२ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता झिरो माइल येथे होणाऱ्या या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित राहणार आहे.”

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here