Nashik Crime News : विनयभंग प्रकरणातील आरोपीला 6 वर्षांचा सश्रम कारावास

    246

    नाशिक : इंदिरानगर परिसरात अल्पवयीन मुलीसह महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणात आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने ६ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. (6 years rigorous imprisonment for accused in molestation case Nashik Latest Crime News)

    हुजेफ रौफ शेख (२१, रा. हनुमान मंदिराशेजारी, माळी गल्ली, वडाळागाव, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. वडाळागावातील म्हाडा बिल्डिंगमध्ये आरोपी शेख याने २४ मार्च २०२१ रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात कोणीही नसल्याचे संधी साधून तिचा विनयभंग केला. तसेच, त्याच इमारतीच्या तिसरया मजल्यावर राहणारया महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत विनयभंग केला होता. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात आरोपी शेख विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एन.एस. बोंडे यांनी गुन्ह्याचा तपास करीत आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायधीश श्रीमती एम.व्ही. भाटीया यांच्यासमोर खटला चालला. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता श्रीमती आर.एम. कोतवाल यांनी कामकाज पाहिले. सबळ पुराव्यांच्या आधारे न्या. श्रीमती भाटिया यांनी आरोपी शेख यास ६ वर्षांची सश्रम कारावास व ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कर्मचारी एस.एस. गायकवाड, एस.यु. गोसावी यांनी पाठपुरावा केला.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here