- मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड येथील कोर्टाने जामीन मंजूर केला आणि त्यांच्या समर्थकांनी सर्वत्र जल्लोष केला. दिवसभरातील नाट्यमय घडामोडींनंतर जामिनावर बाहेर पडलेले नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. मात्र नारायण राणे यांनी ‘सत्यमेव जयते’ असं दोन शब्दांचं ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अटकेत असलेल्या नारायण राणे यांना मंगळवारी रात्री उशिरा कोर्टाने जामीन मंजूर केला. यानंतर नारायण राणे पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधणार की नाही, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र राणे यांनी सध्या तरी फार बोलणं टाळत केवळ ‘सत्यमेव जयते’ असं म्हटलं आहे.