Nagar city : नगर शहरासाठी स्वतंत्र तहसीलदार पद; शासनाचे आदेश

    146

    नगर : नगर शहरासाठी (Nagar city) स्वतंत्र अतिरिक्त तहसीलदार (Additional Tehsildar) पद निर्माण करत असल्याची घोषणा शासनाकडून नुकतीच करण्यात आली. याबाबतचे अधिकृत शासन (Government) आदेश जारी करण्यात आले आहेत. नगर शहराला स्वतंत्र अतिरिक्त तहसीलदार पदाच्या निर्मितीमुळे नागरिकांना मोठाच दिलासा मिळणार आहे.

    नगरमध्ये औद्योगिकीकरण, नागरीकरणाचा झपाट्याने वाढ हाेत आहे. गेल्या दहा वर्षांत सरासरी दहा टक्के लाेकसंख्या वाढली आहे. या विस्तारामुळे नगर तहसील कार्यालयावर कामाचा मोठा ताण पडत होता. नगर जिल्ह्यातील नगर आणि नेवासे तालुक्यांच्या तहसील कार्यालयांचे विभाजन प्रस्तावित होते. नेवासे तहसील कार्यालयाचे विभाजन करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधीर वैरागर यांनी २०१५ पासून केली हाेती. प्रशासकीय पातळीवर विभाजनासाठीचा अहवाल मागविण्यात आला हाेता. या संदर्भात मंत्रालयात नुकतीच बैठक झाली. या बैठकीत प्रशासकीय सोयीसाठी नगर तालुका आणि नगर शहर अतिरिक्त तहसील कार्यालय असे विभाजन करण्यात आले आहे. राज्याचे उपसचिव संतोष गावडे यांनी याबाबतचा अध्यादेश काढला आहे.

    नगर शहरासाठी अतिरिक्त तहसीलदार हे पद निर्माण करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीसाठी एक महसूल सहायक पद निर्माण करण्यात आले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम १३ च्या पोट-कलम (३) नुसार, अतिरिक्त तहसीलदार, नगर शहर यांना तहसीलदारांचे सर्व अधिकार हे कार्यक्षेत्रासाठी राहणार आहेत. नगर शहर अतिरिक्त तहसीलदारांकडे पाच महसूल मंडळे आणि १२ गावांचा समावेश राहणार आहे. नालेगावातील पाच, सावेडीतील दाेन, केडगाव, भिंगार प्रत्येकी एक, नागापूर गावातील तीन गावे राहणार आहे. नगर तहसीलमध्ये अकरा मंडळांचा समावेश असणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांचे कामेही जलदगतीने हाेण्यास मदत हाेणार आहे. नगर तहसील कार्यालयावर कामांचा वाढता ताण लक्षात घेता शासनाने हा निर्णय घेतला आहे. नागरिकांचेही कामे जलदगतीने हाेणार असल्याने नागरिकांना माेठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, शासनाकडून यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. लवकरच या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here