Murder : मुलानेच केला वडिलाचा आणि भावाचा खून

    175

    Murder : श्रीगोंदा : सासऱ्याने मागितलेल्या हुंड्याच्या रकमेवरून आदिवासी कुटुंबात झालेल्या किरकोळ वादातून मुलानेच त्याच्या वडिलांचा आणि भावाचा चाकूने भोसकून खून (Murder) केला. तर दुसऱ्या भावावर आणि आईवर चाकूने वार (Stabbing) करत जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री श्रीगोंदा तालुक्यातील सूरेगाव येथे घडली.

    आरोपी काही तासातच ताब्यात (Murder)

    घड्याळ्या हिरामन चव्हाण तसेच महावीर घड्याळ्या चव्हाण असे हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर आक्रोश घड्याळ्या चव्हाण आणि रिवोन घड्याळ्या चव्हाण या दोघांना चाकूने वार करत गंभीर जखमी केले. याप्रकरणी बेलवंडी पोलीस (Police) ठाण्यात रिवोन घड्याळ्या चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा (crime) दाखल करण्यात आला. हत्या केल्यानंतर आरोपी पसार झाला होता. आरोपी पकडण्यासाठी बेलवंडी पोलिसांनी पथके तयार करत आरोपी जावेद घड्याळ्या चव्हाण याला विसापूर परिसरातून अवघ्या काही तासातच ताब्यात घेतले.

    दहा लाख रुपयांची मागणी (Murder)


     याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी याचे त्याच्या पत्नीशी वाद झाल्याने ती काही दिवसापूर्वी तिच्या माहेरी निघून गेली होती. पत्नीला माघारी बोलावले असता आरोपींचा सासरा आदिक आजगन काळे (रा. म्हसणे फाटा) याने आरोपी जावेद याला “हुंड्याचे दहा लाख रुपये देण्याची मागणी करत तिला सासरी पाठविण्यास नकार दिला. आरोपी त्याच्या पत्नीला घरी आणण्यासाठी वडील घड्याळ्या आणि महावीर यांना दहा लाख रुपयांची मागणी करत होता. मात्र, पैसे नसल्याने घरात वेळोवेळी वाद होत असे.
     गुरुवारी (ता.१८) रात्री १० वाजण्याच्या सुमारास आरोपी जावेद याने पत्नीला घरी आणायचे असल्याचे सांगत १० लाख रुपयांची मागणी करत नाही दिले तर तुम्हाला मारुन टाकीन असे म्हणाला. हातातील चाकू दाखवत पुन्हा वाद घालून शिवीगाळ करत घड्याळ्या चव्हाण यांच्यावर हातातील चाकूने छातीवर वार करण्यास सुरुवात केली. घड्याळ्या चव्हाण याला वाचविण्यासाठी मुलगा महावीर मध्ये आल्याने जावेद याने त्याच्या गळ्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. या वादात जावेद याने त्याची आई रिवोन आणि भाऊ आक्रोश या दोघांना चाकूने वार करत गंभीर जखमी केले. या हल्ल्यात घड्याळ्या हिरामन चव्हाण तसेच महावीर घड्याळ्या चव्हाण हे दोघे गंभीर जखमी झाले. या दोघांना उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना दोघांचा मृत्यू झाला.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here