Mumbai Corona Cases : मुंबईत शनिवारी 394 रुग्णांची नोंद, 623 कोरोनामुक्त

326

Mumbai Corona Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या मुंबईसह महाराष्ट्रात कमी होताना दिसत आहे. आज मुंबईत 394 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतानाचे चित्र दिसत आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शनिवारी 623 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,23,001 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.0 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,707 झाली आहे. सध्या मुंबईत 3,183 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 394 रुग्णांमध्ये 365 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 1673 दिवसांवर गेला आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईतराज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 3183 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 1681 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 2001 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 199, रायगड 391, रत्नागिरी 81, सिंधुदुर्ग 30, सातारा 34, सांगली 60, कोल्हापूर 99, सोलापूर 27, नाशिक 234, अहमदनगर 114, धुळे 17, औरंगाबाद 23, जालना 16, लातूर 52, उस्मानाबाद 30, अमरावती 26, अकोला 21, वाशिम 28, बुलढाणा 20, नागपूर 133, वर्धा 13, भंडारा 16, गोंदिया 11, गडचिरोली 58 आणि चंद्रपूरमध्ये 50 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 8,694 सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात 1272 कोरोना रुग्णांची नोंदराज्यात आज 1272 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1,771 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई जिल्ह्यातील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here