MPSC Exam : एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेत एका मार्काने वंचित असणाऱ्यांना देता येणार मुख्य परीक्षा; विद्यार्थ्यांना कोर्टाचा मोठा दिलासा

404

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) पीएसआय पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची उत्तरपत्रिका (Answer sheet)  आयोगाकडून तीन वेळा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या उत्तरपत्रिकेवर काही विद्यार्थ्यांकडून अक्षेप घेण्यात आला होता. उत्तरपत्रिकेत अनेक प्रश्नाचे उत्तरं चुकीचे असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला होता. याविरोधात विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली होती. उच्च न्यायालयाकडून या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जे विद्यार्थी एका मार्कमुळे मुख्य परीक्षेपासून वंचित राहिले त्यांना मुख्य परीक्षेला बसू देण्याचे आदेश हायकोर्टाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिले आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता येणार आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती, त्याच 86 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2020 या वर्षासाठी पीएसआय पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र जेव्हा आयोगाकडून या परीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली तेव्हा या उत्तरपत्रिकेमध्ये अनेक त्रुटी राहिल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले होते. या उत्तरपत्रिकेमध्ये अनेक प्रश्नाचे उत्तर ही चुकीचे असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात  आला होता. याचा फटका जवळपास 3 हजार 500 विद्यार्थ्यांना बसल्याचा दावा देखील करण्यात आला होता. याविरोधात 86 विद्यार्थ्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. या विद्यार्थ्यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

ज्या विद्यार्थ्यांची एका मार्काने मुख्य परीक्षेची संधी हुकली आहे. अशा विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला बसू देण्याचे आदेश न्यायालयाने आयोगाला दिले आहेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याच 86 विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे. याबाबतचे आदेश न्यायालयाकडून आयोगाला देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here