MPSCकडून 900 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध; आमदार रोहितजी पवार यांच्या प्रयत्नांना यश.
जामखेड चे आ.रोहित पवार यांनी एमपीएससी ने रिक्त पदांची भरती करून राज्यातील तरुणांना नोकरीची संधी द्यावी यासाठी वारंवार पत्रव्यवहार करून सातत्याने हा विषय लावून धरला होता.
अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून एमपीएससीने गट क संवर्गातील रिक्त असलेल्या 900 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये तांत्रिक सहायक (विमा संचालनालय) आणि उद्योग निरीक्षक या दोन पदांचाही नव्याने समावेश केला आहे.
यामुळे अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळेल, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.संबंधित निर्णयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे त्यांनी आभार मानले आहेत. शिवाय MPSC च्या मुलांचे इतर प्रश्नही आपण अशाचप्रकारे मार्गी लावाल, असा विश्वास आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
MPSCकडून ‘महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021’ साठी जाहीर करण्यात आलेल्या पदांमध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभागातील विविध जागांचा समावेश आहे.
उद्योग निरीक्षक (गट क) – 103 पदे दुय्यम निरीक्षक (गट क)- 114 पदे
तांत्रिक सहाय्यक (गट क) – 14 पदे कर सहाय्यक (गट क) – 117 पदे
लिपिक-टंकलेखक (मराठी) – 473 पदे
लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) – 79 पदे




