
शारदीय नवरात्र उत्सव (Navratri festival) काळात राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री क्षेत्र मोहटादेवीच्या (Mohatadevi) चरणी भरभरून दान अर्पण केले आहे. सुमारे एक कोटी ६५ लाखाचे दान देवी भक्तांकडून देवीला अर्पण झाले असून यामध्ये रोख रक्कम,सोने व चांदी यांचा समावेश आहे. मोहटादेवी गडावर देवस्थानचे दानपेटयाची मोजमाप नुकतीच अहमदनगर (Ahmednagar) येथील धर्मादाय उपआयुक्त यांचे प्रतिनिधी उमाकांत फड, देवस्थान विश्वस्त, पाथर्डी येथील सराफ मे. काशिन्नाथ वामन शेवाळे, पोलीस व देवस्थान सुरक्षा व सीसीटीव्हीचे निगराणीमध्ये नुकतेच संपन्न झाले.

मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्र महोस्तव यशस्वी होणेसाठी जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांचे मार्गदर्शनाखाली देवस्थानचे चेअरमन तथा अहमदनगर चे जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी,दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त अश्विनी बिराजदार,उपवनसंरक्षक सुवर्णा माने, तहसीलदार श्याम वाडकर, गट विकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे,विश्वस्त शशिकांत दहिफळे, अँड. कल्याण बडे, डॉ. श्रीधर देशमुख, अनुराधा केदार, अँड. विक्रम वाडेकर, श्रीराम परताणी, बाळासाहेब दहिफळे, प्रतिभा दहिफळे, विठ्ठल कुटे, अक्षय गोसावी यांनी भाविकांना विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या. अशी माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.
