
अकोले: आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी होऊ नये. धनगर व मराठा (Dhangar and Maratha) समाजाला आरक्षण देताना आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू न देण्यासाठी रेल रोको (stop the train) आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी आमदारांनी (MLA) दिला आहे.
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी आमदारांची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी माकप आमदार कॉम्रेड विनोद निकोले, डॉ. किरण लहामटे, राजेश पाटील, सुनील भुसारा, मंजुळा गावित, आमश्या पाडवी, हिरामण खोसकर, नितीन पवार आदी उपस्थित होते.
आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये धनगर समाज असो किंवा कोणत्याही समाजाला आरक्षण देवू नये. धनगर समाज किंवा कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर द्या, परंतु आदिवासी समाजामधे आरक्षण देऊ नये. त्यासाठी येत्या ७ ऑक्टोबर रोजी नंदुरबार येथे रेल रोको आंदोलन तसेच १२ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आंदोलन करणार आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.



