Mayor : अकोलेचा नूतन नगराध्यक्ष ठरणार २७ सप्टेंबरला

    181

    अकोले : येथील नगरपंचायतीच्या (Nagar Panchayat) नगराध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी (ता.२७) होणार आहे. या पदावर कोणाची वर्णी लागते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. दरम्यान आज नगराध्यक्ष (Mayor) पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा (Resignation) दिल्यामुळे नगराध्यक्ष पद रिक्त झाले आहे.

    नगरपंचायतच्या गत निवडणुकीत माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील भाजपने १७ पैकी १२ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले होते. माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे या पदाचे प्रबळ दावेदार समजले जात होते. मात्र, अखेर नगराध्यक्षपदाची माळ सोनाली नाईकवाडी यांच्या गळ्यात पडली. त्यांच्या निवडीनंतर पक्षांतर्गत धुसफूस सुरूच राहिली. सत्तारूढ गटाच्या नगरसेवकांमधील राजकारणाचा परिणाम शहराच्या विकासकामांवर झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत होती. अखेर नगराध्यक्षा नाईकवाडी यांनी आठवडाभरापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

    नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण व्यक्तीसाठी खुले आहे. १७ नगरसेवकांमध्ये मराठा समाजाचे ९ नगरसेवक असून त्यातील ७ नगरसेवक सत्तारूढ भाजपचे आहेत. सर्वसाधारण व्यक्तीसाठी नगराध्यक्षपद असल्यामुळे या पदावर मराठा समाजाला संधी देऊन माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांनी मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी भावना मराठा समाजातून व्यक्त केली जात आहे. तर ओबीसी समाजाचे असणारे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे हेही या पदासाठी प्रमुख दावेदार आहेत. त्यामुळे पिचड पिता-पुत्र कुणाच्या पारड्यात वजन टाकतात याकडे नगरसेवकांसह राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here