Maratha Reservation: मोठी बातमी ! मराठा आरक्षणाचा वाद हायकोर्टात

    135

    नगर : सध्या मराठा आरक्षणावरून राज्यात गदारोळ पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाचा वाद हायकोर्टात (Highcourt) पोहोचला आहे. उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर लवकरच सुनावणी पार पडणार आहे. या आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात वकील गुणरत्न सदावर्तेंकडून दिवाणी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.

    मराठा आरक्षणाचा वाद थेट हायकोर्टात (Maratha Reservation)

    राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणाप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. डॉ. जयश्री पाटील यांच्याकडून राज्य सरकारनं जारी केलेल्या १० टक्के मराठा आरक्षणाला आव्हान देण्यात आलं आहे. २७ फेब्रुवारीला रोस्टर पद्धतीत केलेल्या बदलालाही यावेळी आव्हान देण्यात आलं आहे.

    याचिकेतून गंभीर आरोप (Maratha Reservation)

    निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची आयोगाच्या अध्यक्षपदी झालेली नेमणूक चुकीची असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. तर निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांपेक्षाही जास्त मानधन दिलं गेल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी आरक्षणाला समर्थन देत विनोद पाटील यांच्याकडून हायकोर्टात कॅव्हेट दाखल झाली आहे. यावेळी कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिल्याचा राज्य सरकारचा दावा आहे. लवकरच मराठा आरक्षणाचा लढा हायकोर्टात सुरू होणार असून याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here