Maratha Reservation : मराठा समाजाचं ‘या’ दिवसापासून होणार सर्वेक्षण

    145

    नगर : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) महत्वाची बातमी समोर येत आहे. २३ जानेवारीपासून मराठा समाजाचे सर्वेक्षण (Survey) केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने (Maharashtra State Backward Classes Commission) याबाबत माहिती दिली आहे. २३ जानेवारीपासून सुरु होणारे हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत संपण्याच्या सूचना देखील राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने देण्यात आल्यात. विशेष म्हणजे, महसूल विभागाअंतर्गत मराठा समाजाचे संपूर्णपणे सर्वेक्षण केले जाणार आहे.

    २३ जानेवारीपासून मराठा समाजाचे सर्वेक्षण (Maratha Reservation)

    २३ जानेवारीपासून मराठा समाजाचे सर्वेक्षण आदेश मागासवर्ग आयोगाच्या वतीने देण्यात आले आहेत. या संदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २० जानेवारीला जिल्हाधिकार्यालय आणि महानगरपालिका या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहेत. त्यानंतर वार्ड व तालुका या ठिकाणी हे अधिकारी २० आणि २१ तारखेला प्रशिक्षण देतील. हे सर्वेक्षण २३ जानेवारीला सुरू करून ३१ जानेवारीपर्यंत संपण्याच्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचना आहेत.

    मराठा सर्वेक्षणासाठी तयार केले सॉफ़्टवेअर (Maratha Reservation)

    तसेच, हे सर्वेक्षण करत असताना सॉफ्टवेअर कसं वापरायचं या संदर्भात तीन दिवस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल जाणार आहेत. सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त हे नोडल ऑफिसर म्हणून काम करणार असल्याचे देखील आदेशात म्हटले आहेत. याबाबत मागासवर्ग आयोगाच्या वतीने एक पत्र काढण्यात आले आहे. या सर्वेक्षणासाठी सॉफ़्टवेअर तयार करण्यात आले असून शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सॉफ्टवेअर वापरण्याचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे,असे या पत्रात म्हटले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here