Maratha Reservation : मराठा आरक्षणावर लवकरच ताेडगा : सुजय विखे पाटील

    126

    Maratha Reservation : नगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) संदर्भात आम्ही कायमच सकारात्मक भूमिका मांडली आहे. आमचं समर्थन प्रत्येक वेळी सकल मराठा समाजाच्या (Maratha society) बाजूने राहिले आहे. मराठा बांधवांच्या पाठीमागे आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहोत. राज्य सरकारच्या (State Govt) माध्यमातून लवकरच मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यात येईल, असे मत खासदार डाॅ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी व्यक्त केले.

    शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथे साखर वाटपाच्या कार्यक्रमास खासदार डॉ. सुजय विखे पाटील आले हाेते. यावेळी सकल मराठा समाज बोधेगाव यांनी त्यांची भेट घेऊन सकल मराठा समाजबाधवांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावे, हा मुद्दा लोकसभेत मांडून आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी खासदार विखेंना निवेदन देण्यात आले.

    शेवगाव तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका यांच्या माध्यमातून आजवर कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिलेला नाही. इथून पुढेही निरनिराळ्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे मत मांडून आपण माझ्यावर जो विश्वास दाखवून मतदान केलं, या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. विशेष म्हणजे याची प्रचिती आपल्याला विविध विकासकामांच्या माध्यमातून वेळोवेळी आलीच आहे, असे खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केले.

    खासदार विखे पुढे म्हणाले, ”बोधेगाव गावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व स्व. दिलीप गांधी यांच्या माध्यमातून विविध विकासकामे पूर्णत्वास आली आहेत. यापुढे देखील भरीव निधी उपलब्ध करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे स्पष्ट केले. दरम्यान, २२ जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याच पार्श्वभूमीवर साखर व चणाडाळ वाटपाचे नियोजन सुरू आहे, असे सांगून २२ जानेवारीला आपण दुसरी दिवाळी साजरी करणार आहोत, असे मत मांडले. सर्व लाभधारकांनी या साखरेतून दोन लाडू बनवावे आणि श्रीरामाच्या चरणी नैवेद्य म्हणून ठेवावेत, असे देखील आवाहन खासदार सुजय विखे यांनी उपस्थितांना केले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here