
Manoj Jarange Patil : नगर : गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर साेशल मीडियावर (Social media) सातत्याने टीका हाेत आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांविरोधात मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरले आहे. आजपासून १० फेब्रुवारीपर्यंत जरांगे पाटील राज्याचा दौरा (State tour) करणार आहे. मनोज जरांगे हे आज आळंदी आणि मुंबई असा दोन दिवसांचा दौरा करणार आहेत. यासाठी आज अंतरवाली सराटीवरून १२ वाजता त्यांनी दाैऱ्याला सुरूवात केली आहे.
आळंदी येथेच मुक्काम असणार (Manoj Jarange Patil)
आज (ता. ६) मनोज जरांगे यांनी अंतरवालीहून १२ वाजता दाैऱ्याला सुरूवात केली आहे. शिक्रापूर मार्गे- चाकण आळंदी देवाची, आळंदी येथे नियोजित कार्यक्रमला सायंकाळी ६ वाजता ते हजेरी लावणार आहे. त्यानंतर आळंदी येथेच त्यांचा मुक्काम असणार आहे.
असा असणार दौरा (Manoj Jarange Patil)
बुधवारी (ता. ७) फेब्रुवारी राेजी मनोज जरांगे पाटील आळंदीहून चाकण मार्गे- खोपोली मार्गे- पनवेल मार्गे- कामोठे येथे सकाळी ११ वाजता नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. त्यानंतर नवी मुंबई मार्गे- चेंबूर मार्गे- शिवाजी मंदिर, दादर मुंबई येथे सायंकाळी ६ वाजता नियोजित कार्यक्रमला उपस्थित राहणार आहे. गुरुवारी (ता. ८) राेजी दादर मुंबईतून- नाशिक मार्गे- सटाणा मार्गे साल्हेर किल्ला येथे सकाळी ११ वाजता नियोजित कार्यक्रम आहे. त्यानंतर साल्हेर किल्याहून छत्रपती संभाजीनगर मार्गे- अंतरवाली सराटी जाणार आहे. शुक्रवारी (ता. ९) राेजी अंतरवालीहून– भोगलगाव (जिल्हा-बीड) येथे सकाळी १० वाजता नियोजित कार्यक्रमला उपस्थित राहणार आहे. त्यानंतर भोगलगावहून – बीड मार्गे- कोळवाडी येथे दुपारी १२ वाजता नियोजित कार्यक्रमला उपस्थित राहणार आहे. त्यानंतर श्रीगाेंदे तालुक्यातील औटेवाडी येथे ८ वाजता विजयी सभेचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर कोळवाडीहून बीड – गेवराई मार्गे – अंतरवाली सराटीला जरांगे पाटील रवाना हाेणार आहे. शनिवार (ता. १०) आंतरवाली सराटी येथे सकाळी १० वाजता मराठा समाज बांधवांची महत्वाची बैठक व त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे.





