
Malegaon Blast Case: मालेगाव येथील2008 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए कोर्टाने आज एक ऐतिहासिक निकाल जाहीर केला. या प्रकरणातील सातही आरोपी, ज्यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांचा समावेश आहे, यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
गेल्या १७ वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याकडे देशाचे लक्ष लागले होते.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी यांच्यासह सात जणांवर दहशतवादी कारवायांचा आरोप ठेवला होता. एटीएसने स्फोटासाठी वापरली गेलेली दुचाकी साध्वी प्रज्ञासिंह यांची असल्याचा दावा केला होता. खटल्यात ३२३ साक्षीदारांची चौकशी झाली, परंतु ३७ साक्षीदारांनी जबाब फिरवले. विशेष सरकारी वकिलांनी मृत्युदंडाची मागणी केली होती, परंतु पुराव्याअभावी ही मागणी फेटाळली गेली.