Maharashtra Weather: महाराष्ट्रात वर्षाअखेर थंडी आणखी वाढणार; हवामान विभागाची माहिती

    123

    नगर : राज्यासह देशात तापमानात घसरण (Temperature Dropsहोऊन गारठ्यात वाढ (The cold will increase) झाली आहे. त्यामुळे २०२४ च्या अखेरपर्यंत थंडीचा जोर मात्र कायम राहणार आहे. काश्मीर खोऱ्यात पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टी (Snowfull) सुरु असल्याने उत्तर भारतात थंड वारे वेगाने वाहत आहे. उत्तर भारतासह महाराष्ट्रातील तापमानातही घट झाली आहे. दरम्यान, राज्यात काही तुरळक ठिकाणी पावसाची (Rain) रिमझिम होण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तवला आहे.

    पुढील ३ ते ४ दिवसांत उत्तर-पश्चिम आणि लगतच्या मध्य भारताच्या काही भागात दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यामध्ये पारा कमालीचा घसरला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर जिल्ह्यात पहाटे आणि रात्रीच्या वेळी तापमनात मोठी घट पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे, पण राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तापमानात चढ-उतार झाल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि पुण्यातही थंडी जाणवत आहे.

    हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण भारतात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे दक्षिण भारतात मुसळधार पाऊस होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. आता तामिळनाडूमधील जनजीवन पूर्वपदावर येत असताना आयएमडीने आज पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

    उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही हळूहळू तापमानाचा पारा घसरताना दिसत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील किमान तापमान १२ अंशाखाली पोहोचलं आहे. याशिवाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा चांगला घसरला आहे. २५ डिसेंबरनंतर वेस्टर्न डिस्टबर्न्स तसेच उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वर्षाअखेरसह नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here