Maharashtra Schools : राज्यातील शाळांना ‘या’ तारखेपासून उन्हाळी सुट्टी, कधी लागणार निकाल? जाणून घ्या

495

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शाळांमध्ये उन्हाळी सुट्ट्या सुरू होण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. माहितीनुसार, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी 2 मे 2022 पासून जाहीर करण्यात आली आहे. 2 मे पासून उन्हाळ्याच्या सुट्या 12 जून पर्यंत चालणार आहेत. त्यामुळे 41 दिवस शाळा बंद राहणार आहेत. संपूर्ण राज्यातल्या शाळांमध्ये एकवाक्यता आणि सुसूत्रता आणण्याासाठी राज्य शासनानं हा निर्णय घेतलाय.

‘या तारखेपासून नवीन सत्र सुरू होईल2 मे ते 12 जून या कालावधीत उन्हाळी सुट्या राहणार असून 13 जूनपासून नवीन सत्र सुरू होणार असल्याचे महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले. राज्यातील सर्व शाळांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक हेच राहील. विदर्भात दिवसा तापमान जास्त असल्याने 27 जूनपासून तेथे शाळा सुरू होणार आहेत

निकाल ‘या’ तारखेपर्यंत येईल महाराष्ट्रातील शाळांमध्ये सध्या ऑफलाइन परीक्षांची तयारी सुरू आहे. येथे इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातील. परीक्षा झाल्यानंतर 30 एप्रिलपर्यंत निकाल जाहीर केला जाईल, असेही शिक्षण विभागाने सांगितले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर शाळा बंद राहतील.10 वी आणि 12वीचा निकालमहाराष्ट्र एसएससी आणि एचएससी 2022 चे निकाल कदाचित मे महिन्यात जाहीर होतील. परीक्षेच्या निकालाची अधिकृत अधिसूचना काही वेळात जारी केली जाईल. सध्या या दोन्ही वर्गांसाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here