Maharashtra School Reopen : राज्यात पहिली ते सातवीच्या शाळा लवकरच सुरु? चाईल्ड कोविड टास्क फोर्सकडून हिरवा कंदील

603

Maharashtra School Reopen Updates : राज्यात पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत चाईल्ड कोविड टास्क फोर्सकडून (Child Covid Task Force) काल (मंगळवारी) रात्री झालेल्या बैठकीत हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. राज्य शासनाने शाळा सुरु करण्याबाबत इतर बाबींची पूर्तता केल्यास शाळा सुरु करण्यास काहीच हरकत नसल्याचं चाईल्ड टास्क फोर्सचं म्हणणं आहे. 

लहान मुलांसाठी लस जेव्हा उपलब्ध करून दिली जाईल, तेव्हा लहान मुलांचं लसीकरण सुरु होईल. मात्र त्यापूर्वी शाळा सुरु करण्यास हरकत नसल्याचंही टास्क फोर्समधील डॉक्टरांचं म्हणणं आहे. चाइल्ड टास्क फोर्सनं जरी हिरवा कंदील दिला तरी कॅबिनेट बैठकीत सोबतच मुख्यमंत्र्यांसोबत शाळा सुरु करण्याचा निर्णय बाबत चर्चा केली जाणार आणि त्यानंतर राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. 

पुढील दहा दिवसांमध्ये सर्वांशी चर्चा करून राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण विभाग निर्णय घेऊ शकतो. शहरी भागांत टप्प्याटप्प्यानं शाळा सुरु करायच्या किंवा पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करायच्या याबाबत शिक्षण विभागानं आपली तयारी बघून आणि इतर बाबींची पूर्तता बघून निर्णय घ्यावा, असंही टास्क फोर्सनं स्पष्ट केलं आहे. 

राज्यातील कोरोनाची स्थिती (Coronavirus) आता नियंत्रणामध्ये आल्याचं दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनेक गोष्टी सुरु केल्या आहेत. त्यावर आता मुंबईतील शाळा सुरु करण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासन अनुकूल आहे. पण लहान मुलांच्या लसिकरणानंतरच शाळा सुरु कराव्यात असा कोविड टास्क फोर्सचा आग्रह आहे. मुंबईमध्ये पहिली ते आठवीचे वर्ग सुरु करण्याकरता मुंबई महापालिकेनं तयारी दर्शवली आहे. तसं राज्य सरकारलाही कळवण्यात आलं आहे. शाळा सुरु झाल्यानंतर कोविड रुग्णसंख्या वाढलीच तरी महापालिका प्रशासन पूर्ण सक्षम आहे असे महापालिकेनं राज्य सरकारला कळवलं आहे. 

राज्यातील कोरोना अनलॉकनंतर सार्वजनिक ठिकाणी, गर्दीत लहान मुलांचा वावर वाढल्यानंतरही लहान मुलांमधील कोविड केसेस नगण्य असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे बगीचे, क्रिडांगणे ,बाजार  याठिकाणी लहान मुलांचा वावर वाढला असतांना शाळा सुरु करण्यास हरकत नाही असे महापालिकेचे मत आहे.

राज्यात आता लहान मुलांच्या वयोगटासाठी लसीकरणाची सुरुवात करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबई महापालिकेनेही तीन लाख मुलांच्या लसीकरणाची तयारी केली असून राज्य सरकार आणि कोविड टास्क फोर्सची सूचना येताच या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यात आता शाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात येत असून त्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. पण शाळा सुरु करण्यापूर्वी या मुलांचे लसीकरण करण्यात यावं यासाठी कोविड टास्क फोर्स आग्रही आहे. पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी अशा दोन टप्प्यांमध्ये शाळा सुरु करण्यासंबंधी राज्य सरकारच्या सूचना येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here