Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 84 कोरोना रुग्णांची नोंद, एकही मृत्यू नाही

548

Maharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येच चढ-उतार होत आहेत. सोमवारी राज्यात 84 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 71 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 77,28,162 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. त्याममुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज एकाही कोरोना रूग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 929 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

रूग्णसंख्येत घटराज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात रविवारी 144 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. तर शनिवारी राज्यात 194 कोरोनाचे रूग्ण आढळे होते. आज फक्त 84 रूग्ण आढळले आहेत. शनिवार आणि रविवारपेक्षा आज कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना रूग्णांमध्ये घट झाली असली तरी देशातील कोरोना संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 2,593 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शनिवारी दिवसभरात 1755 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल भारतात कोरोनाचे 2,527 नवे रुग्ण आणि 33 रुग्णांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 15 हजार 873 इतकी झाली आहे. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 22 हजार 193 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 19 हजार 479 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here