Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी 137 कोरोना रुग्णांची नोंद तर 108 रुग्ण कोरोनामुक्त

382

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Update) चढ उतार होताना दिसत आहे. सोमवारी राज्यात 137 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 660 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 108 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आज तीन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,27, 551 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 99, 13, 435 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

राज्यात सध्या 660 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 390 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 49अॅक्टिव्ह रुग्ण आहे.

देशातील कोरोना संसर्गात मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 1247 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. काल 2183 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 214 जणांचा मृत्यू झाला. नवीन मृत्यूंसह देशातील मृतांची संख्या 5 लाख 21 हजार 966 इतकी झाली आहे. सध्या देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 860 इतकी झाली आहे. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 860 इतकी झाली आहे. रविवारी दिवसभरात देशात 928 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 966 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 11 हजार 701 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.03 टक्के इतका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here