Maharashtra Corona Update : राज्यात गुरूवारी 2813 रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्या दहा हजारापार

365

मुंबई : राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसापासून हाच आकडा दोन हजारापेक्षा जास्त आहे. तर आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्या दररोज गेल्या दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे. गुरूवारी राज्यात तब्बल 2 हजार 813 रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत 1702 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.

आज राज्यात 2813 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 1047 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 1702 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज कोरोनाच्या एका मृत्यूची नोंद झाली आहे. आज एका कोरोना मृत्यूची नोंदराज्यात आज एकूण 1047 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,42, 190 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.98 टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज एका कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्या वाढलीराज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 11571 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 7998 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये 1984 इतके सक्रिय रुग्ण आहेत.

देशात गेल्या 24 तासांत 7240 नवे रुग्णगेल्या 24 तासांत 7240 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 32 हजार 490 वर पोहोचली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा फैलाव वेगानं होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 40 टक्क्यांनी वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत देशात 7240 नवीन रुग्ण आढळले असून, सक्रिय रुग्णांची संख्या 32 हजार 490 झाली आहे. त्यापैकी 2,701 रुग्ण केवळ महाराष्ट्रात आढळून आले आहेत. ही गेल्या चार महिन्यांतील सर्वात मोठी वाढ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here