Maharashtra Corona Update : राज्यात गुरूवारी 1182 नव्या रुग्णांची नोंद, 21 महानरपालिकांमध्ये शून्य मृत्यू

419

मुंबई : राज्यातील  कोरोनाचा प्रादुर्भाव  आटोक्यात येत असून  राज्यातील  रुग्णसंख्या कमी होताना  दिसून येत आहे.  गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या  1182 नव्या रुग्णांची भर पडली आहे.  राज्यात आज 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 2 हजार 516  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज  21 महानरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही मृत्यू झालेला नाही.  

राज्यात आज 58 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.  आतापर्यंत 4567 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 4456 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 111 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत

राज्यात आज 19  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख  4 हजार 733 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.99 टक्के आहे.  सध्या राज्यात  1 लाख 56 हजार 920 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 801  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 75 लाख 74  हजार 774 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 

 मुंबईत  आज 119 नवे कोरोनाबाधित आढळले. कालच्या तुलनेत ही रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी असल्याने नागरिकांसह पालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. काल 168 नवे कोरोना बाधित आढळले होते. दरम्यान आज 257 जण कोरोनामुक्त देखील झाले असून त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. यासह आज मुंबईत काही दिवसानंतर पहिल्यांदाच एका कोरोनाबाधिताचा  मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here