Maharashtra Corona Update : राज्यात आज एकही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही; 90 नवीन रुग्णांची नोंद

455

मुंबई: राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आता जवळपास नियंत्रणात आल्याचं चित्र आहे. कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. राज्यात आज कोरोनाच्या 90 रुग्णांची नोंद झाली असून आज राज्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. गेल्या 24 तासात राज्यामध्ये 115 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आज एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे राज्यातील कोरोना मृत्यूदर हा 1.87 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 77,26,576 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 98.11 टक्क्यांवर पोहोचले आहे. 1राज्यात सध्या 778 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. त्यामध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईत असून ती 305 इतकी आहे. तर त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागत असून त्या ठिकाणी 244 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे.

देशात एका दिवसात कोरोनाचे 1 हजार 54 नवीन रुग्ण आढळले असून 29 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 4 कोटी 30 लाख 35 हजार 271 इतकी झाली आहे. तसेच देशातील कोरोनाबळींची संख्या 5 लाख 21 हजार 685 झाली आहे. सध्या देशात कोरोना विषाणूवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 11 हजार 132 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 233 ने कमी झाली आहे. देशातील रुग्णांच्या बरे होण्याचा दर 98.76 टक्के इतका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here