Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढतेय, आज 316 रुग्णांची नोंद

398

मुंबई: राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. बुधवारच्या तुलनेत आजही कोरोनाच्या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली आहे. आज राज्यामध्ये 316 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 201 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बुधवारी राज्यामध्ये 307 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

आज एकही मृत्यू नाहीराज्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,32,282 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे. 1राज्यात आज एकूण 1720 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 1086 रुग्ण हे मुंबईमध्ये आढळतात. तर त्या खालोखाल पुण्यामध्ये, 314 इतके सक्रिय रुग्ण आहेत.

देशाची स्थितीगेल्या 24 तासात देशात 2 हजार 364 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सध्या देशात कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 419 वर पोहोचली आहे. देशात आत्तापर्यंत एकूण रुग्णसंख्या ही 4 कोटी 31 लाख 29 हजार 563 वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या ही 5 लाख 24 हजार 303 वर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. तसेच सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोनारुग्णांची संख्या दोन हजारांच्या खाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here