Maharashtra | 22 जिल्ह्यांत सर्व दुकानं रात्री 8 पर्यत खुली, 11 जिल्ह्यात मात्र कडक निर्बंध

799

22 जिल्ह्यांत सर्व दुकानं रात्री 8 पर्यत खुली, 11 जिल्ह्यात मात्र कडक निर्बंध

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका अद्याप कायम असल्याचं सांगण्यात येत आहे. अशावेळी राज्य सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारने कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 22 जिल्ह्यात मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. तर 11 जिल्ह्यात मात्र लेवल 3 चे निर्बंध कायम असणार आहेत. हे 22 जिल्हे कोणते आहेत, त्यात कोणत्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आलीय? तर कोणत्या 11 जिल्ह्यांमध्ये लेवल 3 चे निर्बंध कायम राहणार आहेत हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

महत्वाची बाब म्हणजे मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यांबाबत आपत्ती व्यवस्थापन विभाग निर्णय घेईल, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या जिल्ह्यातही निर्बंध कायम राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे नव्या नियमानुसार 22 जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवारी 8 वाजेपर्यंत सर्व दुकानं सुरु ठेवता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here