महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी कथित ऑनर किलिंगच्या प्रकरणात एका किशोरवयीन मुलाने आईच्या मदतीने आपल्या गर्भवती बहिणीचा शिरच्छेद केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या सुरुवातीला पळून गेलेल्या आपल्या १९ वर्षीय बहिणीचे मुंडके या मुलाने कापले. तिचा शिरच्छेद केल्यानंतर त्याने शेजाऱ्यांसमोर तिचे डोके दाखविले.
पीडित महिला जूनमध्ये पळून गेली होती आणि ती तिच्या पतीसोबत राहात होती. गेल्या आठवड्यात तिच्या आईने तिच्याशी संपर्क साधून तिला भेटायला सांगितले. रविवारी तिची आई आपल्या मुलासोबत दुसऱ्या भेटीसाठी परतली. आई-मुलगा दोघे गरोदर महिलेच्या घरी पोहोचले तेव्हा तिचा नवरा आजारी होता आणि दुसऱ्या खोलीत पडला होता. महिला चहा बनवत असताना तिच्या भावाने तिच्यावर मागून हल्ला केला. तिच्या आईने तिचा पाय धरला तर तिच्या भावाने विळ्याने तिचे डोके कापले. बहिणीचा शिरच्छेद केल्यानंतर मुलाने शेजाऱ्यांना पाहण्यासाठी डोके बाहेर नेले. त्याने आपल्या भावावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. मुलीच्या पतीने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना मदत मागितली. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडितेच्या भावाने त्यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आणि त्याला त्याच्या आईसह अटक करण्यात आली. या मुलाचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.





