Maharaj Movie : आमिर खानच्या मुलाचे सिनेसृष्टीत पदार्पण;’महाराज’चा फर्स्ट लूक टीझर लॉन्च

    153

    नगर : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा जुनैद खान (Junaid Khan) हा सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. जुनैद हा ‘महाराज’ या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करत आहे. आता या चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर लाँच करण्यात आला आहे. मात्र जुनैदच्या लूक आणि रोलबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे.  

    ‘महाराज’ चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार (Maharaj Movie)

    जुनैद खानच्या अभिनय पदार्पणाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत होती. ‘महाराज’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सने तीन चित्रपटांसाठी यशराज फिल्म्ससोबत हातमिळवणी केली आहे. जुनैद खानच्या ‘महाराज’ शिवाय अनुपम खेरचा ‘विजय ६९’ आणि वाणी कपूरचा ‘मंडला मर्डर्स’ देखील ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सने प्रदर्शित होणाऱ्या या तीन चित्रपटाचे  फर्स्ट लूक टीझर लाँच केले आहेत. महाराजच्या फर्स्ट लूक टीझरमध्ये आलिशान महाल आणि नृत्याचा भव्य नजारा दिसून येत आहे. जुनैद खानच्या लूकला यामध्ये दाखवण्यात आले नाही. त्याचा फर्स्ट लूक या टीझरमध्ये लपवण्यात आला आहे.

    ‘महाराज’ चित्रपटाचे कथानक काय ? (Maharaj Movie)

    ‘महाराज’ या चित्रपटामध्ये साई पल्लवी, शालिनी पांडे, शर्वरी वाघ आणि जयदीप अहलावत यांच्या ही भूमिका आहेत. माहितीनुसार, ‘महाराज’ ची कथा १८६२ च्या महाराजा लिबेलच्या प्रकरणावर आधारीत असल्याचे म्हटले जात आहे. ज्यामध्ये एका धार्मिक पंथाच्या नेत्याने त्याच्या महिला अनुयायांसह अवैध संबंधांचा आरोप करत एका वृत्तपत्रावर खटला दाखल केला होता.

    जुनैदची भूमिका ? (Maharaj Movie)

    या चित्रपटात जुनैद पत्रकाराची भूमिका साकारत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सध्या जुनैद खानची भूमिका आणि लूक पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आला आहे. तो बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची तयारी करत होता. काही आठवड्यांपूर्वी तो वडील आमिर खान आणि अभिनेत्री सई पल्लवीसोबत जपानमध्ये शूटिंग करताना दिसला होता.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here