Maha24News_ औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी! थोडक्यात..

*_ ➡️ काल औरंगाबाद जिल्ह्यात मेघराजाची जोरदार बॅटिंग; शहरातील पैठण गेट परिसरातील दुकानात शिरले पाणी.➡️ शहरात ढगफुटी सदृश्य स्थिती ; ११६ ताशी वेगाने एका तासात ८७.६ मिमी पावसाची नोंद; निम्म्या शहराची बत्ती झाली होती गुल.➡️ मुंबईवरून खुलताबादला आलेल्या युवतीवर प्रियकराने धमकावत केला अत्याचार; युवकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल➡️ सिल्लोड तालुक्यातील पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचे जिल्हा परिषदेचे आदेश.➡️ संजयनगर बायजीपुरा भागातून सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खवा विक्री करणारी टोळी जेरबंद; २८१ किलो हलवा, ६८ किलो स्वीट बर्फी असा एकूण ५५,५९१ रुपयांचा ऐवज जप्त.➡️ मंदिरासमोर घंटानाद आंदोलन भोवले; कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी मनसेच्या १५ ते २० पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल.➡️ कन्नड तालुक्यात मुसळधार पावसामुळे शिवना नदीला महापूर; शिवना टाकळी प्रकल्प ८० टक्के भरला.➡️ सततच्या पावसामुळे गौताळा अभयारण्यात दरड कोसळली.➡️ सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील खेळणा प्रकल्प ओव्हरफ्लो, शहरासह ३० गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सुटला.➡️ गंगापूर तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी नेमणुकीच्या ठिकाणी २० सप्टेंबरपर्यंत मुख्यालयी राहण्याच्या आमदार प्रशांत बंब यांच्या सूचना.➡️ वाळूज औद्योगिक नगरीतील आकार टूल्स कंपनीमध्ये तोडफोड; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.➡️ जटवाडा परिसरातील समृद्धी महामार्गाच्या कामावरून लोखंडी सळ्यांची चोरी, हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.➡️ विद्यापीठ परिसरातील निर्जनस्थळी विनाकारण फिरणाऱ्या ९ मुला-मुलींना दामिनी पथकाने दिली समज.➡️ मौल्यवान दगडांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन.➡️ कचनेर परिसरातून अट्टल दुचाकी चोराला चिकलठाणा पोलिसांनी केले जेरबंद.➡️ पैठण तालुक्यातील नाटकरवाडी येथील रस्ताच वाहून गेला पाण्यात, वाहनधारकांना वाहन चालवताना करावी लागते तारेवरची कसरत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here