Gold Price
नवी दिल्लीः Gold Price Update : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्यात किंचित घट झाली, तर चांदी 505 रुपयांनी स्वस्त झाली. सोने 42 रुपयांनी घसरून 45,960 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाले. आजच्या घसरणीनंतर चांदी 61,469 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदींच्या दरात चढ-उतार होता. दुपारी 4.25 वाजता सोने 1.20 डॉलरने घसरून 1777 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर होते. चांदी 23.52 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर होती. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीवरही दबाव आहे. यावेळी ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोने 40 रुपयांनी घसरून MCX वर 46900 रुपये आणि डिसेंबर डिलिव्हरी सोने 24 रुपयांनी घसरून 47070 रुपयांच्या पातळीवर होते.
चांदीवर आज प्रचंड दबाव
आज चांदीवर प्रचंड दबाव आहे. सप्टेंबर डिलिव्हरीसाठी चांदी 440 रुपयांनी कमी होऊन 62798 रुपये प्रति किलो झाली. डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदी 444 रुपयांच्या घसरणीसह 63521 च्या पातळीवर व्यवहार करत होती.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतीवर थोडासा दबाव आहे. यावेळी -0.11%च्या घसरणीसह सोने प्रति औंस 1,776.20 डॉलरच्या पातळीवर व्यवहार करीत होते. चांदीबद्दल बोलायचे झाल्यास ते -0.77%च्या घसरणीसह 23.59 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर व्यापार करीत होते. एका औंसमध्ये 28.35 ग्रॅम असतात. साप्ताहिक आधारावर चांदीने गेल्या आठवड्यात -0.76% ची घट नोंदवली. सोन्यात -0.12%ने घट झाली.
कच्च्या तेलाची किंमत आणि डॉलरची कामगिरी
आठवड्याच्या पहिल्या दिवशी डॉलरमध्ये किंचित वाढ झाली. यावेळी डॉलर निर्देशांक 92.573 च्या पातळीवर +0.07%च्या बळावर होता. हा निर्देशांक जगातील इतर सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद दर्शवितो. बॉण्डच्या उत्पन्नात सध्या घट दिसून येत आहे. सध्या ते -3.11%च्या घसरणीसह 1.257 टक्के पातळीवर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत पुन्हा 70 डॉलरच्या खाली पोहोचली. आज ते -1.19%च्या घसरणीसह 69.75 डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर व्यापार करत होते.