आजपासून ऑगस्ट महिन्याच्या चौथ्या व्यवहाराच्या आठवड्याला सुरूवात होत आहे. या दरम्यान सोने खरेदीदारांसाठी चांगली बातमी आहे. अजूनही सोने आपल्या आपल्या सर्वोच्च किंमतीपासून सुमारे 9000 रुपये प्रति तोळा स्वस्त मिळत आहे. तर चांदी 17000 रुपये प्रति किलोग्रॅमच्या दराने स्वस्त विकली जात आहे. अशावेळी जर तुम्ही सोने खरेदी (Gold Price Update) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे ही चांगली संधी आहे.
अशावेळी सर्वांची नजर आज या आठवड्याच्या
पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सराफा बाजारावर असेल. मागील आठवड्यात सोन्याच्या किमतीत तेजी नोंदली गेली. जाणकारांनुसार, या आठवड्यात सुद्धा सोन्याच्या किमतीत चढ उतार जारी राहील. तसेच आगामी काळात सुद्धा सोन्यातील गुंतवणूक नफा देऊ शकते.
हे होते सोने-चांदीचे मागील बंद दर
मागील व्यवहाराच्या आठवड्यात शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत किरकोळ 53 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी दिसून आली. या तेजीसह सोने 47276 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले. तर चांदी 1108 रुपये प्रति किलोग्रॅमच्या दराने स्वस्त 62233 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाली.





