नवी दिल्ली : सोने-चांदी (Gold-Silver Price Today) खरेदी करण्याची आता चांगली संधी आहे, कारण गेल्या 2 आठवड्यांच्या घसरणीनंतर सोन्याची किंमत थेट 2000 रुपयांनी खाली आलीय. मात्र, आज त्याच्या किमतीत किंचित वाढ झालीय. MCX वर आज सोन्याचा वायदा 0.24 टक्क्यांनी वाढून 46,476 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर चांदीचा दरही 0.30 टक्क्यांनी वाढला.
सोने आणि चांदीची किंमत काय?
(Gold-Silver Price Today)
MCX वर ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोने 0.24 टक्क्यांनी वाढून 46,476 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याच वेळी चांदीचे दरदेखील 0.30 टक्क्यांनी वाढून 62,044 वर व्यवहार करीत आहेत.
जर आपण दोन आठवड्यांपूर्वीबद्दल बोललो तर सोन्याचा दर 48,390 रुपये प्रति 10 ग्रॅम होता आणि चांदीचा भाव 67,976 रुपये प्रति किलो होता. चांदीचे भाव 6000 रुपयांपर्यंत कमी झालेत.
MCX वर ऑगस्ट 2020 मध्ये 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीनं सुमारे 56,200 रुपयांची उच्च पातळी गाठली होती. त्यानुसार विक्रमी पातळीवरून सोने 9,724 रुपयांनी स्वस्त झाले.




