मागील एक वर्षात कोरोना व्हायरसच्या संसर्गाने देशाला उद्ध्वस्त केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून भारत अद्याप सावरलेला नाही. देश-विदेशात तिसऱ्या धोकादायक लाटेची (COVID-19 3rd Wave dangerous) शक्यता व्यक्त केली जात आहे. आता भारताच्या निती आयोगा (Policy Commission of India) ने सुद्धा कोरोना तिसरी लाट येण्याची शक्यता (possibility of a COVID-19 3rd Wave) व्यक्त केली आहे.
निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल (V. K. Paul) यांनी मागील महिन्यात सरकारला कोरोना संसर्गाला तोंड देण्यासाठी काही सूचना दिल्या होत्या. यात म्हटले होते की भविष्यात प्रति 100 कोरोना व्हायरस संसर्गाच्या प्रकरणांपैकी 23 प्रकरणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था करावी लागेल.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सीजन आणि औषधांअभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला होता, तसेच प्रचंड गोंधळ उडाला होता. कारण, कोरोना संसर्गाचा वेग इतका जास्त होता की तेवढ्या वेगाने वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करता आली नाही. अशावेळी तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत असताना वैद्यकीय सुविधांची व्यवस्था आतापासूनच केली गेली पाहिजे.
कोविड-19 आपल्या सर्वोच्च पातळी होता तेव्हा 1 जूनला देशभरात सक्रिय केस लोड 18 लाख होता. तेव्हा 21.74 टक्के केसमध्ये बहुतांश प्रकरणांच्या 10 राज्यांत हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची आवश्यकता भासली होती. यापैकी 2.2 टक्के लोक आयसीयूमध्ये दाखल होते.
नीती आयोगाचे म्हणणे आहे की यापेक्षा सुद्धा वाईट स्थितीसाठी आपल्याला तयार राहिले पाहिजे.
आयोगाने एका दिवसात 4 ते 5 लाख कोरोना केसचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच म्हटले आहे
की, पुढील महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार केले पाहिजेत. यामध्ये व्हेंटिलेटरसह 1.2 लाख आयसीयू बेड, 7 लाख विना आयसीयू हॉस्पिटलचे बेड (यापैकी 5 लाख ऑक्सीजनाचे बेड) आणि 10 लाख कोविड आयसोलेशन केयर बेड असावेत.




