Maha 24 news – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या*
▪️इम्पेरिकल डेटा गोळा होपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका घेऊ नये, यावर सर्वपक्षीयांचे एकमत! बैठकीनंतर फडणवीस, भुजबळ आणि वडेट्टीवार यांनी मांडल्या भूमिका. उत्तर भारतीयांना हवंय महाराष्ट्रात आरक्षण, राज्य सरकारकडे मागणी, विजय वडेट्टीवार यांच्याकडून शिफारस करण्याचं आश्वासन
▪️टोकियो पॅरालिम्पिकमध्ये अवनी लेखराचा अजून एका पदकावर निशाणा, कांस्यपदक जिंकलं, भारताचं बारावं पदक. उंच उडीत प्रवीण कुमारची ‘रौप्य’भरारी.
▪️देशातील सक्रिय रुग्णसंख्या 4 लाखांवर; 24 तासांत 45 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद. राज्यात गुरुवारी 4,342 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97. 04 टक्क्यांवर.
▪️’ताई, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू. तुम्ही चिंता करू नका, लवकर बरे व्हा..’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना दिल्या शुभेच्छा..
▪️अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. हृदयविकाराच्या धक्क्याने झाले सिद्धार्थचे निधन. मुंबईतील कूपर रुग्णालयात शवविच्छेदन. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची पुष्टी.
▪️माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फरार घोषीत करुन त्यांची संपत्ती जप्त करावी.. भाजप नेते किरीट सोमय्या यांची मागणी. संचयनी ग्रुपकडून गुंतवणूकदारांच्या झालेल्या फसवणुकीबाबत किरीट सोमय्या व आमदार नीतेश राणेंची रत्नागिरी पोलिसांसोबत चर्चा.
▪️बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस. राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी..
▪️सोन्याच्या किमतीत वाढ. सोन्याने 47000 रुपये तोळा ओलांडला. चांदीच्या किमतीत किंचित वाढ. चांदी 0.02 टक्क्यांनी वाढून 63,297 रुपये प्रति किलोवर..
▪️राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी राष्ट्रवादीच्या कोट्यातून संधी मिळालेले राजू शेट्टी यांचा पत्ता कापल्याची चर्चा. सरकारविरोधातील मोर्चे भोवले? त्यांच्या जागी माजी आमदार हेमंत टकले यांना संधी दिल्याची माहिती.
➖➖➖➖➖➖➖➖➖