Loksabha : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज राहा

    100

    नगर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून राज्यभरामध्ये विभागीय बैठकांचा सध्या धडाका सुरू आहे. नगरसह उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक नाशिक येथे काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकतीच पार पडली. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा, (Loksabha) विधानसभा निवडणुकांसाठी नगर शहरातील कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.

    नाशिक येथे पार पडलेल्या बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, नगर शहर जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अनिल पाटील, राज्याचे प्रवक्ते राजेंद्र वाघमारे, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ आदी उपस्थित हाेते. शहर जिल्हा काँग्रेसतर्फे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा म्हणाले, ”नगर शहरामध्ये काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढली आहे. आगामी महापालिका निवडणूक ही स्वबळावर लढण्याची तयारी शहरामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली केली आहे.”

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here