Lok Sabha Election 2024 : ‘लाेकसभे’ला लाेकांची पसंती कुणाला; सर्व्हेची धक्कादायक आकडेवारी समाेर

    124

    Lok Sabha Election 2024 : नगर : देशात २०२४ साली होणाऱ्या लाेकसभेच्या निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) ‘महायुती’ आणि ‘महाविकास’ आघाडीनं तयारीला सुरूवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून कंबर कसली असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत, अशातच महायुतीची (Mahayuti) काळजी वाढवणारा धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे. यानुसार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मुसंडी मारेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

    एप्रिलमध्ये लाेकसभा निवडणुकीची शक्यता (Lok Sabha Election 2024)

    देशात एप्रिलमध्ये लाेकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी इंडिया टुडे आणि सी व्होटरनं ‘देशाचा मूड काय?’ हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमधून संभाव्य निकाल आश्चर्यकारक असतील, अशी माहिती समोर आली आहे.

    महाविकास आघाडीला २६ तर २२ जागांवर महायुतीला (Lok Sabha Election 2024)

    या सर्व्हेनुसार महाराष्ट्रातील एकूण ४८ लोकसभेच्या जागांपैकी महाविकास आघाडीला २६ जागांवर विजय मिळेल, तर उर्वरित २२ जागांवर महायुतीला समाधान मानावं लागेल, असं चित्र आहे. तसेच महायुतीला महाराष्ट्रात ४०.५ टक्के मतं, तर महाविकास आघाडीला ४४.५ टक्के मतं मिळतील असं दिसत आहे. त्यातही महायुतीतील तिन्ही पक्षांचे मिळून २२ तर महाविकास आघाडीला २६ जागा मिळतील असाही अंदाज आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here