Leopard : रूईछत्रपतीमध्ये आढळले बिबट्याची पिल्लं

    101

    Leopard : पारनेर : तालुक्यातील रूईछत्रपती येथे ऊस तोडणीचे काम सुरू असताना मजुरांना बिबट्याचे (Leopard) तीन पिल्लं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अचानक बिबट्यांची पिल्लं (Leopard cubs) आढळून आल्याने मजुरांसह परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. यावेळी वनरक्षक (forest guard) , वनपाल वनपरिक्षेत्र पारनेर यांच्याकडून ऊसतोडणी तात्पुरती थांबवण्यात आली.     

    माहिती पसरताच नागरिकांची घटनास्थळी एकच गर्दी (Leopard)

    पारनेर तालुक्यातील रूईछत्रपती शिवारात सध्या ऊस तोडणीचे काम सुरू आहे. पाझर तलावाखाली पांदन रस्त्यालगत परिसरात शेतकरी दिनकर रावसाहेब दिवटे यांच्या शेतातील ऊस मजूर तोडत असताना बिबट्याची तीन पिल्लं आढळून आले. याबाबत मजुरांनी शेत मालकाला या घटनेची माहिती दिली. दिवटे यांनी सदर माहिती वनविभागाला दिली. घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत एकच गर्दी केली होती.

    वनविभागाद्वारे मादी बिबट्या व पिल्लांवर नजर (Leopard)

    मात्र, वनरक्षक उमाताई केंद्रे यांनी उपस्थित ग्रामस्थांना बिबट्याविषयी माहिती दिली. बिबट्याच्या तिन्ही पिल्लांना वनविभागाद्वारे संरक्षण देण्यात आले आहे. रूईछत्रपती येथे मादी बिबट्या व पिल्लांवर नजर ठेवण्यात आली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here