Lalit Patil: ललित पाटीलससूनमधून पळाला, नाशिकमध्ये जाऊन FD मोडली, एक किलो सोनंविकत घेतलं: सुषमा अंधारे

    155

    पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेतअसलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. मुंबई पोलिसांच्या एका पथकाने त्याला बुधवारी चेन्नई येथून ताब्यात घेतले. त्यानंतर ललित पाटील याला मुंबईत आणण्यात आले. असून त्याला आता न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा ललित पाटील प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. परंतु, ललित पाटील यानेच रुग्णालयात प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर, ‘मी ससूनमधून पळालेलो नाही, मला पळवण्यात आलंय’, असे वक्तव्य केले होते. हाच धागा पकडत सुषमा अंधारे यांनी ललित पाटील यांनी पुणे पोलिसांबाबत काही प्रश्न उपस्थित केले. जो पोलीस म्हणाला की, ललित पाटील माझ्या हाताला झटका देऊन पळाला, तोच पोलीस ललित पाटील याच्यासोबत लेमन ट्री हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होता. त्यामुळे ललित पाटील याला ससूनमधून कोणी पळवून लावले,हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये फक्त ससून रुग्णालय प्रशासनच नव्हे तर काही बड्या राजकीय शक्तींचा हातही असल्याचा आरोप सुषमा ‘अंधारे यांनी केला. त्या पुण्यातललित पाटीलला पळवून लावण्यात राजकीय नेते सहभागी आहेत. ललित पाटीलसोबत दादा भुसे आणि शंभूराजे ‘नार्को टेस्ट करा. याचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपवा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. इतकंच नाही तर ससून रुग्णालयाच्या डीनची नार्को टेस्ट करा, अशी मागणीही सुषमा अंधारे यांनी केली. ललित पाटील हा श्रीलंकेला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली. यानंतरच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, ललित पाटील हा ससूनमधून पळाल्यानंतर धुळे, नाशिक, गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये वास्तव्याला होता. नाशिकमध्ये जाऊन ललित पाटीलने बँकेतील आपली मुदत ठेव (Fixed Deposite, मोडली होती आणि त्या पैशातून ललितने एक किलो सोने विकत घेतले होते यानंतर तो देशाबाहेर पलनात होना ललित किलो सोने विकत घेतले होते. यानंतर तो देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता. ललित पाटील अनेक दिवस नाशिकमध्येच असताना पोलीस यंत्रणा काय करत होती? देशात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला.

    ललित पाटीलची सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

    ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी बुधवारी दुपारी अंधेरी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने ललित पाटीलला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ललित पाटीलच्या बाजूने कोणताही वकील नव्हता. त्यामुळे न्यायालयाकडूनच त्याला वकील पुरवण्यात आला. यावेळी सरकारी वकिलांनी अधिक चौकशी करण्यासाठी ललित पाटीलच्या रिमांडनी मागणी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here