Lagna kallol Movie :’लग्नकल्लोळ’ मधील मयुरी,सिद्धार्थ व भूषणचा फर्स्ट लूक समोर

    153

    नगर : मराठी सिनेसृष्टीचा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), भूषण प्रधान (Bhushan Pradhan) आणि मयुरी देशमुखच्या (Mayuri Deshmukh) ‘लग्नकल्लोळ’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चांगलीच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचे एक जबरदस्त मोशन पोस्टर आपल्या भेटीला आले होते. या पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव पाठमोरे दिसत होते. आता त्यांच्या लूकवरील पडदा उठला असून त्यांचे चेहरे समोर आले आहेत.

    डॉ. मयुर तिरमखे यांनी केले लग्नकल्लोळचे दिग्दर्शन (Lagna kallol Movie )

    सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दोघेही मुंडावळ्या बांधून वरमाला घेऊन सज्ज आहेत. मात्र दोघांपैकी कोण मयुरीच्या गळ्यात ही वरमाला घालणार, हे अद्याप गुपित आहे. हे गुपित १ मार्चला उलगडणार आहे.मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल  तिरमखे, डॉ. मयुर तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.

    ‘लग्नकल्लोळ’ चित्रपटात भूषण प्रधान हा अथर्वच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ जाधव हा मारूतीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मयूरी देशमुख ही श्रृतीची भूमिका साकारणार आहे. या तिन्ही कलाकारांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटातील त्यांची भूमिका आणि फर्स्ट लूक शेअर केला आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, निर्माते डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात, ” चित्रपटात या तिघांच्या भूमिका आहेत, हे यापूर्वीच जाहीर झाले आहे. आता त्यांचे लूक प्रेक्षकांसमोर आले आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना धमाल पाहायला मिळणार आहे. हे कलाकारच इतके कमाल आहेत की, हे कल्लोळ करणार हे नक्की आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here